Chikkodi

चिक्कोडीत भाजप आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली

Share

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय विजयेंद्र याना पोलिसांनी अटक केल्याचा निषेध करत चिक्कोडी येथे भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने करत टायर जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय विजयेंद्रला पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपचे चिक्कोडीचे जिल्हाध्यक्ष सतीश आप्पाजीगोळ यांच्या नेतृत्वाखाली चिक्कोडी येथे आंदोलन करून राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला. त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी टायर पेटवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि सीपीआय विश्वनाथ चौगला यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. शेवटी सीपीआय विश्वनाथ चौगला यांनी भाजप कार्यकर्त्यांना शांत केले आणि त्यांना टायर जाळण्याची संधी दिली नाही.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश आप्पाजीगोळ यांनी मुडा घोटाळ्यात सहभागी असलेल्या सीएम सिद्धरामय्या आणि मंत्री भैरती सुरेश यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली.

यावेळी शांबवी अश्वथपुरे, अमृता कुलकर्णी, रमेश कलन्नवर, राजू हरगन्नवर, अभय मानवी आदी उपस्थित होते.

Tags: