Belagavi

केडीपी बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त

Share

एकीकडे केडीपीच्या बैठकीत बेळगावच्या विकासासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाची चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे अधिकारी केवळ मोबाईलकडे बघत वेळ घालवताना दिसत होते.

बेळगाव जिल्हा पालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आज बेळगावातील सुवर्णसौध येथे केडीपीची बैठक बोलावण्यात आली होती. जिल्ह्य़ात डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांची गंभीर चर्चा सुरू असतानाच अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले.

विधान परिषदेचे सदस्य आणि दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी हे अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत असताना दुसरीकडे अधिकारी फेसबुक आणि व्हॉट्सॲपचा वापर करून व्हिडिओ पाहत असल्याची दृश्ये पाहायला मिळाली. जिल्ह्य़ातील प्रश्न मार्गी लागावेत, जिल्ह्य़ाच्या विकासावर चर्चा व्हावी, अशा बैठकीत अधिकारी वेळ घालवत असतील, तर जिल्ह्याचा विकास कसा शक्य होणार?

Tags: