हिरेबागेवाडी गावातील बसवेश्वर सर्कलमध्ये उड्डाणपूल किंवा अंडरपास रस्ता बांधण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर याना हिरेबागेवाडी ग्रामस्थानी निवेदन दिले .
हिरेबागेवाडी ग्रामीण मतदारसंघातील हिरेबागेवाडी सर्कलजवळील राज्य महामार्ग व राष्ट्रीय मार्ग यादरम्यान वाहतुकीसाठी ओव्हरपास किंवा अंडरपास रस्ता बांधण्यात यावा, या मागणीचे निवेदन खासदार जगदीश शेट्टर यांना देण्यात आले. यासंदर्भात निवेदन सादर करून , उत्तर कर्नाटक जनसंग्राम परिषदेचे सरचिटणीस मंजुनाथ वस्त्रद म्हणाले की, पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आणि बेळगाव- बैलहोंगल राज्य महामार्ग याच हिरेबागेवाडी निवासी भागातून जातात, त्यामुळे येथून प्रवास करण्यासाठी सुरक्षित मार्ग नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अशास्त्रीय नियोजनामुळे जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांना व विद्यार्थ्यांना जीवाची भीती आहे . ते म्हणाले की, राह्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ रस्ता ओलांडताना अनेक अपघात झाले असून त्यामुळे जीवितहानी झाली आहे. यावेळी संजय देसाई, सी.एस.कथपुरीमठ, दयानंद हंचीनमनी, निंगाप्पा मखन्नवर, इमामसाब गुडूसाब अत्तार, सुरेश बंडीवड्डर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.


Recent Comments