मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे भूखंड घेतले आहेत. तसेच मुडा मधील 4000 कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला असून त्याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, या मागणीसाठी बेळगाव भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले.
आज शुक्रवारी , बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेकायदेशीर कामे केली आहेत. अधिग्रहित जमिनीऐवजी ५०:५० या प्रमाणात जमीन द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या आदेशाचे उल्लंघन करत 14 भूखंड ताब्यात घेतले आहेत. मुडा येथील 4000 कोटींच्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्री सिद्धरामय्या थेट सहभागी आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, या मागणीसाठी बेळगाव भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव बुडा भ्रष्टाचाराबाबत बोलताना राज्य उपाध्यक्ष अनिला बेनके यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. बेकायदेशीररित्या संपादित केलेले बुडा भूखंड परत घेतले जातील. तपास अहवालावर सर्व काही ठरवले जाईल, असे ते म्हणाले. महापालिका क्षेत्रातील अतिक्रमण टाळण्यासाठी संरक्षण भिंती बांधण्याचा सल्ला आपण यापूर्वीच महापौरांना दिल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सरकारच्या काळात महामंडळाची एकही मालमत्ता विकली गेली नसल्याचे स्पष्ट करत , नाल्यांवरील अतिक्रमणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, नगरसेवक हणमंत कोंगाळी, सचिन काडी आदींचा सहभाग होता.


Recent Comments