Belagavi

मृत्यूनंतरही आयुष्य सार्थकी लावणारे : मधुकर गोजे पाटील

Share

बेळगावमधील निवृत्त सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर मधुकर गोजे पाटील यांच्या निधनानंतर नेत्रदान आणि त्वचादान करून त्यांचे आयुष्य मृत्यूनंतरही सार्थकी लागले आहे.

मधुकर गोजे पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉ. प्रभाकर कोरे नेत्र पेढीला नेत्रदान करण्यात आले. याचप्रमाणे के एल इ च्या रोटरी चर्म भांडाराला चर्मदान करण्यात आले.

यावेळी के एल इ डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाच्या वतीने गोजे पाटील कुटुंबीयांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी के एल इ डॉ. प्रभाकर कोरे नेत्र भांडाराचे संयोजक डॉ. शिवानंद बुबनाळे, चर्म भांडाराचे संयोजक डॉ. राजेश पवार, समाजसेवक विजय मोरे, चंद्रशेखरय्या सवडी आणि ट्रस्टचे कार्यदर्शी डॉ. महांतेश रामण्णावर आदी उपस्थित होते.

Tags: