Hukkeri

हुक्केरी तालुक्यात डेंग्यूने अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू

Share

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरातील अनंत विद्या नगर येथील श्रेया देवदत्ते या अकरा वर्षांच्या मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घडला घडली आहे .
श्रेया हिला गेल्या सोमवारी ताप आला आणि तिला सोमवारी रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र आज तिचा मृत्यू झाला .

मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच संकेश्वर सार्वजनिक रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दत्ता दोडमणी, डॉ. पौर्णिमा तल्लुर यांच्या पथकाने अनंत विद्या नगर येथे कॅम्प लावून स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

Tags: