केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांच्या पथकाने वस्तू आणि साहित्याची विक्री न करता बनावट पावत्या तयार करून कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी एका आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.
केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांच्या पथकाने बनावट पावत्या तयार करून करचुकवेगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला असून वस्तू आणि साहित्याची वाहतूक करण्याव्यतिरिक्त फेडरल लॉजिस्टिक कंपनीचे मालक नकीब नजीब मुल्ला यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. बनावट पावत्या तयार करून कर चुकवलेल्या आणि व्यवसायाने कर सल्लागार असलेल्या नकीब नजीब मुल्ला यांनी जीएसटीमध्ये १३२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. फसवणूक करणाऱ्या कर सल्लागार नकीब मुल्ला याला केंद्रीय जीएसटी पथकाने अटक करून बेळगावच्या द्वितीय जेएमएफसी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती जीएसटीचे प्रधान आयुक्त दिनेश पांगरकर यांनी दिली.


Recent Comments