मोहरम हा मुस्लिम धर्मीय बांधवांचा सण हिंदू – मुस्लिम बांधवांनी एकोप्याने आणि शांततेत तसेच सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन बैलहोंगल तालुक्याचे सीपीआय पंचाक्षरी सालीमठ यांनी केले.

बैलहोंगल पोलीस स्थानकात मोहरमच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत बोलताना सीपीआय सालीमठ म्हणाले, मोहरमच्या पार्श्वभूमीवर कोणीही कायदा हातात घेऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नये. शांततामय उत्सवात जातीय तेढ निर्माण करून अडथळा आणल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता हा उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस अल्लाबक्ष दास्तीकोप, इरफान, बाबू आडीमनी, सिद्धय्या पुराणिकमठ, अशोक नागनू, अल्लासाब अत्तार आदी उपस्थित होते.


Recent Comments