Belagavi

२०२४ -२५ च्या शैक्षणिक वर्षांपासून आरपीडी महाविद्यालय स्वायत्त असेल

Share

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अखत्यारीत असणारे आणि विशेषाधिकार प्राप्त करणाऱ्या आणि प्रतिष्ठित दर्जा प्राप्त करणाऱ्या मोजक्याच महाविद्यालयांपैकी , आरपीडी महाविद्यालय एक आहे असे महाविद्यालयात प्राचार्य डॉ . अभय एम पाटील यांनी सांगितले .

गुरुवारी ,एसकेई सोसायटीच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले कि , आरपीडी महाविद्यालय ही दक्षिण भारतातील नावाजलेल्या संस्थांपैकी एक संस्था आहे . ज्या संस्थेने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषडेची मान्यता प्रक्रिया सन २००० मध्ये सुरु करून मानांकन प्राप्त केले आहे . युजीसी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून , स्वायत्त दर्जा असा संस्थांना प्रदान केला जातो .

ज्यांच्याकडे NAAC द्वारे मूल्यमापन केल्यानुसार सातत्यपूर्ण गुणवत्तेत नावीन्य आणण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता या महाविद्यालयाने ठेवली आहे . राणी चन्नमा विद्यापीठाच्या अखत्यारीत असणारे व विशेषाधिकार प्राप्त करणाऱ्या आणि प्रतिष्ठित दर्जा प्राप्त करणाऱ्या मोजक्याच महाविद्यालयांपकी आरपीडी महाविद्यालय हे एक आहे . स्वायत्ततेचा दर्जा महाविद्यालय त्याच्या अभ्यासक्रमाची आणि परीक्षा प्रणालीची रचना लवचिक , सक्षम कार्ल जी आताच्या काळाशी मिळतीजुळती आहे .

आताच्या काळजी गरज , विध्यार्थीकेंद्री नविनयपूर्णता आणि कौशल्यभिमुखता यांनाच विचार करून शैक्षणिक वाटचाल सुरु आहे . २०२४ -२५ च्या शैक्षणिक वर्षांपासून आरपीडी महाविद्यालय स्वायत्त असेल . महाविद्यालयाने या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केला आहेत असे प्राचार्य डॉ . अभय पाटील यांनी सांगितले . तसेच बेळगाव मधील एस के इ सोसायटीच्या , जी एस एस महाविद्यालयाला सलग चार वेळा NAAC कडून मान्यता मिळाल्याने महाविद्यालयाला स्वायत्तता हे स्टेटस मिळाल्याची माहिती जी एस एस कॉलेजचे प्राचार्य प्रा . बी एल मजूकर यांनी दिली .

यावेळी डॉ . शरयू पोतनीस तसे डॉ . एच बी कोलकर उपस्थित होते .

Tags: