Belagavi

वॉर्ड क्र . २१ मधील नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक लसचे घरोघरी जाऊन वितरण

Share

पावसाळ्यात डासांची झपाट्याने वाढ होत असल्याने सगळीकडे डेंग्यु आणि चिकन गुणिया झालेले अनेक रुग्ण पहावयास मिळत आहेत त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बेळगांव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या विशेष पुढाकाराने आणि मार्गर्शनाखाली,वार्ड नं.२१ च्या नगरसेविका प्रिती कामकर यांनी आपल्या वार्डामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवित आहेत.

आज वॉर्ड क्रमांक २१ श्रींगारी कॉलनी, बाडीवाले कॉलनी, टीचर्स कॉलनी, पाटील गल्ली, कुंती नगर,येथे डेंग्यू आणि चिकनगुनिया लस घरोघरी जाऊन देण्यात आली . यावेळी समाजसेवक विनायक कामकर व कार्यकर्त्यांनी मिळून घरोघरी जाऊन डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंध लस वितरित केली . यावेळी गणपती वडेर, सूर्यकांत हिंडलगेकर, संतोष श्रींगारी, शंकर कांबळे आर एम हेरेकर , प्रकाश शहापूरकर,बाळू मिराशी,राजू तपास्कर, सौरभ घोरपडे , निकिता बोमन्नावर , खंनुरकर,संदीप रायकर, रविकुमार कम्मार , दळवी या सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या भागातील सर्व कॉलनीतील नागरिकाना गुरुकृपा मेडिकल येथे मोफत लस उपलब्ध असून याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे

Tags: