Uncategorized

नियंत्रण सुटलेली दुचाकी कम्पाउंडला धडकल्याने दोघांचा मृत्यू

Share

विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील रुगी क्रॉसजवळील सुलागम्मादेवी मठाजवळ दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघे ठार झाले .

दुचाकीस्वार नागेश नावी (27) आणि सिद्दू बिरादार (37) या दोघांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे . दुचाकीस्वाराचा ताबा सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाऊंडला धडकली .

अपघातातील दुर्दैवी मृतांचे मृतदेह इंडी तालुका रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. ही घटना इंडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे .

Tags: