Belagavi

आम. बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर पंचमसाली समाजाचे आंदोलन

Share

कुडल संगम पिठाचे बसवजय मृत्युंजय महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ गावात पंचमसाली समाजाने पत्र आंदोलन केले.

लिंगायत समाजातील सर्व उपसमुदायांना ओबीसी आरक्षण देण्यात यावे, यासाठी पंचमसाली समाजाच्या मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर पत्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज कुडल संगम पिठाचे बसवजय मृत्युंजय महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ गावात आम. बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर पंचमसाली समाजाने पत्र आंदोलन केले.

बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ गावातील जगद्गुरू मडीवाळेश्वर स्वामी यांचे शिवयोगी मठातून शोभायात्रेने आगमन झाले. यानंतर आम. बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर पत्र आंदोलन करून लिंगायत समाजातील सर्व उपसमुदायांना ओबीसी आरक्षणाची मागणी करण्यासाठी सरकारवर दबाव आणावा अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनाचा स्वीकार करून येत्या पावसाळी अधिवेशनात पंचमसाली समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारसमोर प्रस्ताव मांडून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन आम. बाबासाहेब पाटील यांनी दिले.

यावेळी माजी आमदार विश्वनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष आर.के.पाटील, निंगाप्पा पिरोजी, धरेप्पा ठक्कनवर, बसवराज कोट्रशेट्टर, रोहिणी पाटील, श्रीशैल बोलन्नवरा, महेश हरकुणी, गुंडू पाटील, राजू कुडसोमनवरा, संजय भावी, दोड्डगौड हुच्चगौडर आदी उपस्थित होते.

Tags: