हिंडलगा ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील श्री कलमेश्वर देवस्थानच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटवण्यासंदर्भात हिंडलगा ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत सर्व गावकरी आणि ग्राम पंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ठराव करून अतिक्रमण हटवण्यात आले .
हिंडलगा ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत असलेल्या श्री कलमेश्वर देवस्थानच्या जागेवर एका व्यक्तीने अतिक्रमण केले होते . हे अतिक्रमण हटवण्यासाठी , गावातील ग्राम सुधारणा कमीटी , मंदिर जीर्णोद्धार कमिटी , युवक मंडळे तसेच देवस्की पंचानी बैठक घेऊन , हा विषय ग्रासमभेत मांडण्याचा निर्णय घेतला होता . त्यानुसार आज बुधवारी झालेल्या ग्रामसभेत हा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला .
ग्राम पंचायत अध्यक्षा मीनाक्षी हितलमनी तसेच पीडीओ बसवंत कंडेमनी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत उपस्थितांनी मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची जोरदार मागणी केली . ही जागा गावाची असून त्यावर झालेले अतिक्रमण हटवण्याचा एकमताने ठराव करून , हे अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली . यावेळी बैठकीत थोडा वादविवाद देखील झाला .
यावेळी पीडीओ बसवंत कंडेमनी यांनी सर्व सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पीडीओ बसवणात कंडेमनी यांनी या बैठकीत मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण हटवून मंदिर गावाच्या ताब्यात देण्याचा ठराव एकमताने मंजूर करून बैठक संपल्यानंतर हे अतिक्रमण लगेचच हटवण्यात यावे असे सांगितले . बैठकीनंतर गावच्या सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले ..अतिक्रमित जागेवर लावण्यात आलेला बोर्ड हटवण्यात आला .
इन न्यूजला माहिती देताना हिंडलगा ग्राम सुधारणा कमिटीचे सदस्य गजानन साखळकर तसेच एका ग्राम पंचायत सदस्यानी सांगितले कि , अतिक्रमित जागा ताब्यात घेण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला असून , त्यानुसार अतिक्रमण हटवून गावाची जागा ताब्यात घेण्यात आली आहे .गावातील अन्य सार्वजनिक जागांवर झालेली अतिक्रमणे देखील अशीच हटवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .

देवस्की पंच कमिटीचे नागेश किल्लेकर यांनी या अतिक्रमणाबाबत माहिती देताना सांगितले कि, हिंडलगा कलमेश्वर मंदिराच्या संदर्भात गावातील देवस्की पंच, ग्राम सुधारणा कमिटी , जीर्णोद्धार कमिटी,गावातील युवक मंडळे आणि जेष्ठ नागरिकांची बैठक घेऊन , हिंडलगा ग्राम पंचायतीला निवेदन देऊन , हे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात ठराव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला . त्यानुसार आज अध्यक्ष , उपाध्यक्ष , पीडीओ तसेच समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत अतिक्रमण काढून टाकण्याचा ठराव संमत करून आज अतिक्रमण काढून टाकून जागा गावाच्या कब्जात घेण्यात आली .
एकंदर हिंडलगा ग्रामसभेत गावाची अतिक्रमित जागा , अतिक्रमण हटवून गावाच्या ताब्यात घेण्याचा ठराव करण्यात आला . आणि अतिक्रमित जागेवरील बोर्ड हटवून टी जागा गावाच्या ताब्यात घेण्यात आली .


Recent Comments