राज्यातील वाल्मिकी महामंडळ घोटाळ्याचा तपास एसआयटीऐवजी सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी केली आहे.

अथणी शहरात वाल्मिकी महामंडळ घोटाळ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्यातील काँग्रेस सरकारने दलितांच्या पैशाचा गैरवापर केला आहे. हमी योजनेसाठी एसटी आरक्षणाचा हजारो कोटींचा पैसा वापरण्यात आला, मात्र दलितांचा उद्धार करण्याच्या कामाकडे डोळेझाक केली आहे.
त्याशिवाय राज्यातील वाल्मिकी महामंडळाच्या घोटाळ्याचा तपास एसआयटीला करता येणार नाही, त्यामुळे सरकारने तो सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments