Belagavi

सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप; तालुका पंचायत सहायक संचालकांच्या निलंबनाची मागणी

Share

शासकीय अनुदान निधीचा गैरवापर करणाऱ्या , तालुका पंचायत सहाय्यक संचालक गणेश के.एस. याना निलंबित करून गैरव्यवहार झालेला पैसा परत मिळेपर्यंत डॉ.बी.आर.आंबेडकर शक्ती संघाच्या वतीने बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे.

तालुका पंचायत सहायक संचालक गणेश के.एस. खानापुर तालुक्यातील ग्रामपंचायत विकास अधिकारी असताना त्यांनी कोणताही हिशेब न देता नंदगड, कसबा नंदगड आणि हेब्बाळ गावाला मंजूर केलेल्या शासकीय अनुदानाचा गैरवापर केल्याचा आरोप करत आज बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. बी. आर.आंबेडकर शक्ती संघाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.

2010 ते 2020 या कालावधीत ते ग्रामपंचायत विकास अधिकारी असताना सध्याचे तालुका पंचायत सहायक संचालक गणेश के.एस. यांनी कोणताही हिशेब न देता शासकीय अनुदानाचा दुरुपयोग केला आहे. लक्ष्मण कोलकार यांनी , त्यांना तात्काळ निलंबित करून गैरव्यवहाराची रक्कम वसूल होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिला.

यावेळी सागरा कोलकार, शेखर मेत्री, भरमू कुरळी, रवी मादार, नागेश मादार,, महेश शिगीहल्ली, मल्लप्पा अक्कमड्डी, शक्ती शिगीहल्ली आदींचा सहभाग होता.

Tags: