दरवर्षीप्रमाणे येथील कंग्राळ गल्ली शेतकरी संघ , कंग्राळ गल्ली पंच मंडळ , नागरीक आणि बेळगाव देवस्थान मंडळ यांच्या वतीने हनुमान नगर येथे धुपटेश्वर( गौळदेव )पूजा मोठ्या उत्साहात पार पडली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बेळगावच्या महापौर सरिता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण , माजी आमदार अनिल बेनके , नगरसेवक , शंकर पाटील, नगरसेविका विना विजापुरे उपस्थित होत्या. प्रारंभी बेळगाव देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी देवासमोर गाऱ्हाणे घातले . बेळगाव गावात आणि परिसरात खूप पाऊस होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पिके डोलू देत नागरिकांना पिण्यासाठी भरपूर पाणी मिळू दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली .

यानंतर परंपरेप्रमाणे बैल पळवून भाताचे गोळे मारण्यात आले . यावेळी महापौर कांबळे यांचा सन्मान शोभा मोरे तर उपमहापौर आनंद चव्हाण यांचा सन्मान नगरसेवक शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार अनिल बेनके नगरसेविका विणा विजापुरे , रणजीत चव्हाण पाटील , प्राचार्य आनंद आपटेकर , अनंतराव पाटील, प्राचार्य सुधीर एन पाटील यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .
समारंभात माजी महापौर मालोजी अष्टेकर, , शंकर बडवानाचे , अशोक कंग्राळकर , बाबुराव कुटरे , दौलत मोरे, रमेश मोरे, दुर्गेश मैत्री , शरद पाटील , प्रकाश पाटील , नारायण चौगुले , लक्ष्मण किल्लेकर , सागर मुतकेकर व कंग्राळ गल्लीतील युवा कार्यकर्ते व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले


Recent Comments