केम्पेगौडा यांनी उभारणी केलेल्या बेंगळुरूचे नाव राखण्यासाठी रामनगर जिल्ह्याचे नामांतर बेंगळुरू दक्षिण असे करण्यासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिली.
रामनगर जिल्हा पालकमंत्री रामलिंग रेड्डी, माजी खासदार डी के सुरेश आणि खासदार इकबाल हुसेन यांच्यासह अनेकांनी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. चन्नपट्टण, रामनगर, मागडी, कणकपूर आणि हारोहळ्ळी सह बेंगळुरू दक्षिण जिल्हा घोषित करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. रामनगर जिल्ह्याच्या कारभारात कोणताही बदल होणार नाही. सद्यस्थितीत असणारे प्रशासकीय केंद्र रामनगरमध्येच असेल. मात्र जिल्ह्याचे नाव बदलून बंगळुरू दक्षिणा करण्यात येणार आहे. बंगळुरूचे नाव ठेवल्याने या भागातील जनतेला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बंगळुरूला आंतरराष्ट्रीय ख्याती आहे. या नावामुळे या भागातील लोकांच्या जमिनीचे भाव वाढणार आहेत. उद्योगधंदेही वाढतील. म्हैसूरचेही बरेच फायदे आहेत. हे लक्षात घेऊन रामनगर जिल्ह्याचे नामकरण बंगळुरू दक्षिण असे करण्यात येणार आहे. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली असून त्याबाबतही विचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी वाल्मिकी महामंडळ घोटाळ्याबाबतही त्यांनी डी के शिवकुमार यांनी दिले असून अद्याप यातील सत्य बाहेर आले नसल्याचे त्यांनी सांगितले. या घोटाळ्याच्या सुरुवातीपासूनच माजी मंत्री नागेंद्र यांचे नाव घेण्यात येत असून या घोटाळ्याशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु दबावाला बळी पडून त्यांनी राजीनामा दिला असून वाल्मिकी महामंडळ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आम्ही पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.असेही डीकेशींनी स्पष्ट केले.


Recent Comments