बेळगावातील बाबू जगजीवनराम पुतळ्याला चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
चिक्कोडी लोकसभा खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी भारताचे माजी उपपंतप्रधान आणि हरित क्रांती प्रणेते बाबू जगजीवनराम यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी बेळगाव जिल्हा एमआरएचएसचे जिल्हाध्यक्ष बसवराज अरवली यांनी शाल श्रीफळ देऊन नूतन खासदारांचा सत्कार केला.
यावेळी दलित नेते मल्लेश चौगले , यल्लाप्पा हुदली , बाबू पुजारी, संतोष कोलकार व समाजाचे नेते उपस्थित होते.


Recent Comments