Banglore

सिलिंडरचा स्फोट होऊन पाचजण जखमी

Share

स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना बेंगळुरू मधील कुमारस्वामी लेआऊट मध्ये घडली आहे.

मूळचे उत्तरप्रदेशमधील आणि सध्या बेंगळुरू येथे वास्तव्यास असणारे राकेश, कृष्णा, हरिराम, रामधन आदींसह पाचजण जखमी झाले आहेत. सिलिंडरच्या स्फोटामुळे घरावरील छप्पर कोसळले आहे. बेंगळुरू मध्ये राहून पीओपी आणि सिलिंगचे काम हे तरुण करतात. कामावर जाण्यापूर्वी गॅस पेटविण्यात आला त्यावेळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घरातील एक रहिवासी शौचालयात असल्याने तो बीचवला असून अन्य पाचजण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी व्हिक्टोरिया रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कुमारस्वामी लेआऊट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

Tags: