झाडे जगवणे आणि त्यांचे संगोपन करणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे अशी प्रतिक्रिया उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू सेठ यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय वन महोत्सवानिमित्त आमदार राजू सेठ यांच्या हस्ते बेळगाव शहरातील अंजुमन शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
आमदार राजू सेठ बोलताना म्हणाले, जंगल असेल आपल्याला पाणी आणि अन्न मिळेल. पाऊस पडला तर शेतात पीक उगवू शकते. जंगल वाचल्यासच सर्वांना अन्न मिळू शकते. गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असून आता भविष्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराभोवती झाड लावून वनसंपत्ती वाढविण्याच्या दृष्टीने कठोर परिश्रम केले तर दुष्काळ निश्चितपणे दूर होऊ शकतो.

असे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त झाडे लावणे आणि हरित क्रांती घडवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ वनविभागानेच नाही तर प्रत्येकाने आपल्या घरात एक झाड लावून समृद्ध हरित राष्ट्र बनवायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी डीसीएफ मारिया राजू, एसीएफ शिवरुद्रप्पा कबाडगी, डीआरएफओ विनय एस गौडर, वन अधिकारी मल्लिकार्जुन आणि सिद्धार्थ उपस्थित होते.


Recent Comments