चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या खासदारपदी निवडून आलेल्या प्रियांका जारकीहोळी यांनी खासदार झाल्यानंतर प्रथमच बेळगावला भेट दिली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, आपल्या वडिलांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालत असून संविधानानुसार आपण सर्व कामकाज करण्यावर भर देत आहोत. संविधान वाचविण्यासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू. ज्येष्ठ खासदारांचा सल्ला घेऊन आपल्या मतदार संघातील सर्व समस्या सोडविण्यासाठी अधिवेशनात सर्व मुद्दे मांडेन असे त्या म्हणाल्या.
स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून चिकोडीला जिल्ह्याचा दर्जा देण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदारपदी निवडून आलेल्या प्रियांका जारकीहोळी यांचे आज बेळगाव काँग्रेसच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी नागनूर रुद्राक्षीमठाला भेट देऊन स्वामीजींचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला भेट देऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्याचप्रमाणे राणी कित्तूर चन्नम्मा चौकातील कित्तूर राणी चन्नम्मांच्या स्मारकालाही अभिवादन केले. यावेळी दलित संघटनांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर त्यांनी लिंगायत भवनला भेट देऊन विश्वगुरू बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, जयश्री माळगी, बसवराज रोट्टी, मल्लेश चौगुले, आयेशा सनदी आदी उपस्थित होते.


Recent Comments