DEATH

मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागून विद्यार्थ्याचा मृत्यू

Share

मोबाईल फोन चार्ज करताना विजेचा धक्का बसून , एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बेंगळुरूमधील बसवेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत मंजुनाथ नगर येथे घडली.

बीदर येथील श्रीनिवास (२४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे, तो बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर कोर्स करत होता, तो मंजुनाथ नगर येथील पीजीमध्ये राहत होता. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास खोलीत असलेले श्रीनिवास मोबाईल चार्ज करत असताना विजेचा धक्का बसून श्रीनिवास यांचा मृत्यू झाला. काही वेळाने खोलीबाहेर असलेला त्याचा मित्र श्रीनिवासला जेवायला बोलावण्यासाठी गेला असता तो जमिनीवर पडल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असताना श्रीनिवासच्या मित्रालाही विजेचा धक्का बसला. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला .

पीजी कर्मचाऱ्यांनी तत्काळ बसवेश्वर नगर पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी बसवेश्वर नगर पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: