Belagavi

बेळगावात पार पडली खुली जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा

Share

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे खुल्या जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावच्या गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या स्केटिंग रिंक येथे नुकतीच हि स्पर्धा पार पडली. यामध्ये दीडशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण पाटील, सुनील नागरे, रुपेश पाटील, महेश बागी, ​​बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव नागप्पा, प्रसाद तेंडोलकर, सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ यळ्ळूरकर, स्केटिंगपटू व त्यांचे पालक उपस्थित होते.

स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पटकावून उपस्थितांची वाहवा मिळविली. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकर गौडा आदींनी परिश्रम घेतले.

Tags: