Dharwad

जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना- जिल्हाधिकारी दिव्या प्रभू

Share

जिल्ह्यात डेंग्यूने एका बालकाचा मृत्यू झाला असून, जिल्हा रुग्णालयात दररोज डेंग्यूची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत असे धारवाडच्या जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांनी सांगितले .

केळगेरी, धारवाड येथे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या नेतृत्वात डेंग्यू जनजागृती मोहिमेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि त्या म्हणाल्या कि , , “जेथे डेंग्यूच्या अळ्या निर्माण होतात तेथे आम्ही आधीच नियंत्रण करत आहोत. 2016 च्या चाचणीत 254 प्रकरणे पॉझिटिव्ह आली आहेत. जानेवारीपासून सुरू असलेल्या चाचणीत आता ३ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. एका मुलाचा मृत्यू झाला.

बाकीचे बरे होऊन घरी गेले आहेत. आम्ही दररोज सर्व रुग्णालयांमध्ये चाचणी करत आहोत. त्या म्हणाल्या की, सध्या आमच्याकडे किटची कमतरता नाही, खासगी रुग्णालयात दाखल असलेल्यांचीदेखील आम्ही त्यांच्याकडून माहिती घेत आहोत.

Tags: