Belagavi

महम्मद रोशन यांनी बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून स्वीकारला पदभार

Share

महम्मद रोशन यांनी बेळगावचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्याचवेळी मावळते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निरोप देण्यात आला .

बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची बंगळुरू येथे बदली झाली असून हेस्कॉमचे एम डी बेळगावचे नवे जिल्हाधिकारी बनले आहेत. महम्मद रोशन यांची नियुक्ती करणारा आदेश सरकारने जारी केला आहे.

नूतन जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांनी अधिकाराची सूत्रे हाती घेतली. त्याचवेळी निर्गमित जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनि नूतन जिल्हाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानुसार निर्गमित जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनाही पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला .

निर्गमित जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तडकाफडकी बेंगळूरूला बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी नियुक्ती झालेले आयएएस अधिकारी मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी सकाळी बेळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

गुरुवारी ,जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या बदलीचा आदेश आल्यानंतर शुक्रवारी सकाळी मोहम्मद रोशन यांनी पदभार स्वीकारला.यावेळी नितेश पाटील यांनी मोहम्मद रोशन यांना पदभार हस्तांतरित केला. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रोबेशनरी आयएएस दिनेश कुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आदी उपस्थित होते.


नितेश पाटील यांनी 5 मे 2022 पासून 4 जुलै 2024 दोन वर्षे एक महिना बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे त्यांची बदली बंगळुरु येथे झाली आहे.2015 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले मोहम्मद रोशन यांनी याआधी हुबळी हेस्कॉम एम.डी म्हणून कार्य केले आहे. बी टेक आणि फायनान्स मधून एम बी ए केलेले मोहम्मद रोशन यांनी कारवार आणि हावेरी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावली होती.

सार्वजनिक धोरण या विषयावर एम ए केले आहे. त्यांना कन्नड हिंदी तेलगू उर्दू आणि कोकणी भाषा अवगत आहेत. ते मूळचे हैदराबादचे असून डॉक्टर कुटुंबातून आहेत. एम बी ए आणि इंजिनियरिंग करण्याआधी त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हैद्राबाद येथेच पूर्ण झाले आहे.

नागरी सेवेतील त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून प्रेरित होऊन, त्यांनी इंजीनियरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत असताना आयएएस परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्यानी प्रिलिम पास केली असली तरी त्यांना मुख्य परिक्षेत यश मिळाले नव्हते. एमबीए पूर्ण करताना त्यानी युपीएससीचे आणखी दोन प्रयत्न केले त्यात 2014 मध्ये 44 वा क्रमांक मिळवून तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले.त्यांच्या पत्नी देखील रेल्वे खात्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Tags: