Banglore

केंद्रीय महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मंत्री हेब्बाळकरांनी केली चर्चा

Share

केंद्रीय महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी राज्य महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विविध योजना, उपक्रम, अनुदान आणि इतर मुद्द्यांव चर्चा केली.

बेंगळुरू येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत कर्नाटक राज्य महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केंद्र सरकारच्या भागीदारीत विभागीय प्रकल्प, मान्यता, अनुदान आणि इतर मुद्द्यांवर केंद्रीय मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच केंद्रीय महिला आणि बाल मंत्रालयाचे सचिव अनिल मल्लिक यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या भागीदारीत विविध योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली.

महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प, अनुदानाची रक्कम, 2024-25 या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कार्यक्रमांना मान्यता, राज्यातील पोषण अभियान, मिशन शक्ती, वात्सल्य यासह केंद्राच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी शासनाचे प्रधान सचिव डॉ. जी.एस.प्रकाश, विभागीय संचालक सिद्धेश्वर, महिला व बाल संरक्षण अधिकारी एम. आर. रवी, मंत्र्यांचे विशेष अधिकारी बी.एच. निश्चल आदी अधिकारी उपस्थित होते.

Tags: