Chikkodi

हातमाग कामगारावर चाकू हल्ला

Share

चिक्कोडी तालुक्यातील मानकापुर गावात हातमाग कामगारावर चाकू हल्ला केल्याची घटना सकाळी घडली.

गावातील सागर बापू कुंभारा (वय 55) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. जखमी सागरवर चिक्कोडीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

सागर कुंभार हा देवगोंडा चौघुले हातमाग कारखान्यात कामाला होता, मनोहर कोरवी याने सकाळी अचानक सागरवर हल्ला करून तेथून पळ काढला. माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार , ग्रामपंचायत माजी अध्यक्षा वैशाली कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत सागरला तातडीने चिक्कोडी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

कोरवी यांनी मानसिक स्थैर्य गमावले असून हे कृत्य करणाऱ्या कोरवीवर कडक कारवाई करण्याची मागणी लोकांनी केली आहे. सदलगा पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घटना घडली.

Tags: