Athani

दुचाकी वाहनांचा भीषण अपघात

Share

दोन दुचाकी वाहनांमध्ये झालेल्या समोरासमोरील भीषण धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर आणखी दोघे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

अथणी मधील सवदी नजीक हा अपघात घडला असून जमखंडीपासून चमकेरी या आपल्या गावी परतताना हा अपघात घडला आहे. या अपघातात चमकेरी गावातील निंगाप्पा दुंडाप्पा मंगळुरु या ६५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून आणखी दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अथणी तालुका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अथणी पोलिसांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

Tags: