Belagavi

सहकारी संघ शेतकऱ्यांची जीवनरेखा :प्रियांका जारकीहोळी

Share

प्राथमिक कृषी सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या जीवनवाहिन्या असून त्यांच्या प्रगतीला प्राधान्य देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

यमकनमर्डी प्राथमिक शेतकरी सहकारी संस्थेच्या नवीन गोदाम व शेतकरी सेवा केंद्र इमारतींचे उद्घाटन खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या नूतन खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रियंका जारकीहोळी यांचा यावेळी कृषी पत्तीन संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या, संघाचे सर्व सदस्य व शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने यमकनमर्डी प्राथमिक कृषी शेतकरी सहकारी संस्था आज प्रगतीपथावर आली आहे. आगामी काळात ही संघटना प्रगतीच्या शिखरावर जाईल, असे त्या म्हणाल्या.

यावेळी हुक्केरी तालुका सहकारी विकास अधिकारी एस ए पाटील, यमकनमर्डी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष सुहास जोशी आदी उपस्थित होते.

Tags: