Belagavi

बाळेकुंद्री गावातील महालक्ष्मी देवस्थानात चोरी

Share

बाळेकुंद्री येथील महालक्ष्मी देवस्थानात दागिने चोरी करून चोरट्यांनी पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री गावातील श्री महालक्ष्मी देवस्थानात मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यात आली. काल रात्री चोरांनी मूर्तीवर घालण्यात आलेले दागिने चोरी करून पळ काढल्याची घटना उघडकीस आली. महालक्ष्मी देवस्थानाचे पुजारी दरवाजा बंद करून कुलूप लावून निघून गेले होते. मात्र रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारत तेथून पळ काढला आहे. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

Tags: