Athani

अथणी तालुक्यातील शेगुणशी गावात अस्वच्छेचे साम्राज्य

Share

अथणी तालुक्यातील शेगुणशी हे गाव प्रभावी लोकांचे व शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव आहे, विशेषत: या गावात राज्यात सर्वात जास्त अवयव दान करण्यात आले आहे. गावाची खरी स्थिती पाहिल्यास तुम्हालाही धक्का बसेल.

शेगुणशी गावातील प्रत्येक वसाहतीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने , सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. राज्यात डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराने थैमान घातले असून ग्रामपंचायत प्रशासन व गटविकास अधिकारी यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे ग्रामस्थ रोज नरकयातना भोगत आहेत.
ज्या अधिकाऱ्यांनी गावात हायटेक यंत्रणा द्यायची आहे, त्यांचे मौन म्हणजे गावातील जीवघेण्या आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.

वरिष्ठांनी तातडीने गावात भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे निरीक्षण करून गावात स्वच्छता राखून डेंग्यू तसेच अन्य संसर्गजन्य आजारांपासून गावाला मुक्त करावे या अशी मागणी करण्यात येत आहे .

Tags: