hubbali

गटारीत आढळले मृत नवजात अर्भक

Share

हुबळी शहरातील गमनगट्टी गावातील तारिहाळ रोडवर एका नवजात अर्भकाला गटारीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

गटारीत एक नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले . इथल्या नागरिकांनी नवजात अर्भक पाहून एपीएमसी नवानगर स्टेशनच्या पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत नवजात अर्भकाला नाल्यातून बाहेर काढले व गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Tags: