Dharwad

धारवाडमध्ये झाड कोसळून रिक्षाचे नुकसान

Share

धारवाड येथील कोर्ट सर्कलजवळ एक झाड अचानक उन्मळून पडल्याने रिक्षा चक्काचूर झाली.

हुबळी धारवाडच्या मुख्य रस्त्यावर अचानक झाड पडल्याने एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले. धारवाडमधील ज्युबली सर्कल आणि कोर्ट सर्कल येथे या घटनेनंतर वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी मनपा कर्मचाऱ्यांनी दाखल होऊन झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.

Tags: