Belagavi

बेळगावमध्ये १३ जुलै रोजी लोकअदालतीचे आयोजन

Share

बेळगावमध्ये येत्या १३ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून जनतेने यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव न्या. मुरलीमनोहर रेड्डी केले आहे.

१३ जुलै रोजी आयोजिण्यात आलेल्या लोक अदालतीत अपघात, वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या, चेक बाऊन्स प्रकरण, भूसंपादन, फसवणूक यासारकजे दिवाणी आणि फौजदारी खटले निकाली काढून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षकारांना योग्य मार्गदर्शन आणि न्याय मिळवून देऊन खटले निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीत जनतेने सहभाग घ्यावा, असे आवाहन न्या. मुरलीमनोहर रेड्डी केले आहे.

Tags: