Belagavi

हलगा येथील अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी

Share

बेळगाव तालुक्यातील हलगा येथे एक नियंत्रण सुटलेला कंटेनर दुभाजकावर चढून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडक दिल्याने दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

बेळगाव तालुक्यातील हलगा गावातील अलारवाड ब्रिजजवळील ऑक्स वॅगन शोरूमजवळ गुरुवारी पहाटे एका कंटेनरचे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडक दिली. तसेच बंगळुरूहून मुंबईकडे निघालेल्या कंटेनरमधील दोन प्रवासीही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: