Belagavi

पाठ्यपुस्तकातून ‘वीरशैव’ पद वगळण्याच्या सरकारच्या भूमिकेचे स्वागत

Share

पाठ्यपुस्तकातील मजकुरातून वीरशैव शब्द वगळण्याचा आणि सुधारित मजकुराबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे जागतिक लिंगायत महासभा स्वागत करते असे पत्र जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

इयत्ता नववीच्या समाज विज्ञान पाठ्यपुस्तकातून ‘विश्वगुरू बसवण्णा सांस्कृतिक नायक’ या शीर्षकाखाली मांडण्यात आलेला विषय उत्तम असून या पाठात वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. या पाठात समर्पक आणि वस्तुस्थिती मांडण्यात आली असून यामधील वीरशैव हा शब्द वगळण्याचा सरकारचा निर्णय कौतुकास्पद आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

काही राजकारण्यांनी वीरशैव शब्द वगळण्यात आल्याने विरोध व्यक्त केला असून हे निंदनीय आहे. अशा नेत्यांना सरकारने थारा देऊ नये, सरकारच्या या निर्णयाला जागतिक लिंगायत महासभेचा संपूर्ण पाठिंबा आहे. इतिहास बदलण्याचा प्रयत्न केल्यास इतिहास आणि बसव तत्वांचा विरोध केल्याप्रमाणे होईल. सरकारने असा निर्णय घेतल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बसवराज रोट्टी यांनी दिला.

Tags: