रायबाग विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावाला मुलभूत सुविधा देण्यासाठी मतदारसंघाला अधिक निधी दिला जाईल, असे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी सांगितले.
करोशी गावातील गटर कामकाजासाठी 10 लाख रुपये आणि कमत्यानट्टी गावात 10 लाख रुपये असे अनुदान येत्या काळात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी जिल्हा पंचायत सदस्य महेश भाटे म्हणाले की, करोशी गावातील गटारीचे बांधकाम होण्यासाठी येथील जनतेला खूप मदत होणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष पंचाक्षरी हालजोळे, विजय कोठीवाले, बाळू मुगळी, महांतेश भाटे, अण्णासाहेब शेंडुरे, सावित्री जायदे, राजू यल्लईगोळ , दुंडया पुजारी, महेश चौडनावर, राजू कोटगी, तौफिक पटेल, जिल्हा पंचायत एईई एस.आर. पाटील, बसवराज पाटील, आदी लक्ष्मण कुंभार , चिदानंद आंबाळे , संतोष आंबाळे आदी उपस्थित होते.
Recent Comments