पुस्तके वाचल्याने व्यक्तीचे व्यक्तिमत्व सुधारते. त्यासाठी नेहमी वाचनाची सवय लावावी. शिक्षकांनी मुलांना शाळेत वेगवेगळी पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच ग्रामीण भागात वाचनाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत शिक्षक सतीश पाटील यांनी व्यक्त केले.
वेदांत फाऊंडेशनच्या वतीने कावळे वाडी येथील महात्मा गांधी वाचनालय आणि शहरातील 5 मराठी व कन्नड माध्यमांच्या शाळांना सुमारे 1700 पुस्तके देणगीदाखल देण्यात आली.
टिळकवाडी , चिंतामणराव हायस्कूल, शहापूर, चेन्नम्मानगरच्या शाळांना पुस्तके देण्यात आली.
मुख्याध्यापक सतीश पाटील म्हणाले की, कावळेवाडीचे वाचनालय १५ वर्षांपासून कार्यरत असून या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होतात. त्यामुळे या वाचन कक्षाला पुस्तके दिली जातात. शहरातील अनेक शाळांना स्वत:चे वाचन कक्ष असून शहापूर व टिळकवाडी येथील शाळांची निवड करून पुस्तके देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
असिफ अत्तार म्हणाले की, वेदांत फाऊंडेशनतर्फे अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आजचा पुस्तक वाटपाचा कार्यक्रमही चांगला आहे.
सुमन देशपांडे, आर. एस. जोशी, एन. एम. कुलकर्णी, महादेव माने, ए. एम. हुलगबळी, वर्षा लंगरकांडे, राजश्री वराळे आदी उपस्थित होते.


Recent Comments