Belagavi

ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध..!

Share

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ब्राह्मण विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे यांनी सांगितले.
शहरातील उद्यमबाग येथील फौंड्री क्लस्टर येथे ट्रस्टच्या वतीने आयोजित ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश वाटप केल्यानंतर ते बोलत होते.
ब्राह्मण समाज ट्रस्टच्या इच्छेनुसार आम्ही काम करत आहोत. ज्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मागितली त्यांना ट्रस्टने मदत केली आहे. यापुढे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्राह्मणांनी अधिक संघटित होण्याची गरज आहे. याबाबत त्यांनी ब्राह्मण समाज ट्रस्टशी हातमिळवणी करण्याचे आवाहन केले.
यावेळी ब्राह्मण समाज ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.
ट्रस्टचे सचिव विलास बदामी, सहसचिव विलास जोशी, कोषाध्यक्ष रमेश कुलकर्णी, नगरसेविका वाणी जोशी, माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे आदी उपस्थित होते.

Tags: