Belagavi

बेळगाव जिल्हा न्यायालयाचे नूतन न्यायाधीश त्यागराज इनवल्ली यांचा सत्कार

Share

बेळगाव मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाचे नूतन न्यायाधीश म्हणून न्यायाधीश त्यागराज एन इनवल्ली यांचा बेळगाव बार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला.
बेळगावच्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या न्यायाधीश त्यागराज एन इनवल्ली यांचा बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष एस.एस. किवडसन्नवर यांनी स्वागत करून सत्कार केला .

ऍड . वाय.के. दिवटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलतांना न्यायाधीश त्यागराज एन इनवल्ली यांनी सर्वांचे आभार मानले व मार्गदर्शन केले. यावेळी , कुलकर्णी, बी.जे. गंगई, एस.टी. मुंदरगी, विजयकुमार पाटील आदींचा सहभाग होता.

Tags: