व्यक्ती आजारी असताना औषधोपचाराची गरज असते. अशावेळी देवाचे रूप म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर मदत करतात . अलीकडे अनेकांना वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक नैराश्य येते. अशा लोकांवर योग्य वेळी उपचार करणे ही मोठी जबाबदारी असल्याचे रोटरीचे माजी अविनाश पोतदार यांनी सांगितले.
संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने आदर्शनगर, वडगाव येथे डॉक्टर दिनानिमित्त मानसोपचार तज्ज्ञांचा सत्कार करताना ते बोलत होते. मंचावर संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मदन बामणे यांच्यासह बांधकाम व्यावसायिक आर.एम. चौगुले उपस्थित होते. मदन बामणे यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर्स डे सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून डॉ. एस.एस.चाटे, डॉ. अँटोनियो कारेव्हालो आणि डॉ. विजयालक्ष्मी यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. सुरेखा पोटे, डॉ. अनिल पोटे, डॉ. अनिल सावलगी, डॉ. सविता देगीनाळ , सरिता सिद्धी आदींचा सहभाग आहे.


Recent Comments