खडी वाहून नेणाऱ्या ट्रकमधील खडी रस्त्यावर सांडल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी यंग बेळगाम फाउंडेशनतर्फे ती खडी हटवली
काल बेळगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी जवळील अशोक आयर्न वर्क्स समोर एका दुचाकीचा अपघात झाला असून यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. रस्त्यावर सांडलेल्या खडीमुळे दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला.
असे अपघात पुन्हा होऊ नयेत, यासाठी यंग बेलगाम फाउंडेशनच्या वतीने खडी बाजूला सारून स्वच्छ करण्यात आला.
शहरात ओव्हरलोड ट्रकच्यामधून खडी रस्त्यावर सांडत जात असल्याने असे अपघात घडत असून, वाहतूक पोलिस विभागाने यावर कारवाई करण्याची गरज आहे. ओव्हरलोड ट्रक आढळून आल्यास त्यांना दंड करावा आणि अपघात टाळण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी यंग बेलगाम फाउंडेशनचे प्रमुख ॲलन मोरे यांनी केली.
या वेळी मृणाल कलमणी, संदीप सोमनट्टी , आदित्य गावडे, नितीन कोठारी, लकी सोलंकी, ध्रुव हंजी आदींचा सहभाग होता


Recent Comments