Kagawad

श्री बसवेश्वर केंपवाड सिंचन प्रकल्पाची चाचणी ५ ते १० जुलै कालावधीत

Share

कागवाड मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांचे स्वप्न असलेल्या श्री बसवेश्वर केंपवाड सिंचन प्रकल्पाची चाचणी ५ ते १० जुलै या कालावधीत होणार असल्याचे कर्नाटक राज्य पाटबंधारे विभागाचे एम डी राजेश अम्मीनभावी यांनी सांगितले.

ऐनापूर शहरात बोलताना कर्नाटक राज्य पाटबंधारे विभागाचे एमडी राजेश अम्मीनभावी म्हणाले की, कागवाड मतदारसंघातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बसवेश्वर केंपवाड सिंचन प्रकल्पाची चाचणी 5 ते 10 जुलै दरम्यान होणार आहे.


आमदार राजू कागे म्हणाले कि , बसवेश्वर केंपवाड पाटबंधारे प्रकल्प माझ्या कार्यकाळात 2017 मध्ये सुरू झाला होता, मात्र हा प्रकल्प वर्षभरापूर्वी सुरू व्हायला हवा होता. या प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक अडचण नाही, आता जुलैच्या 10 दिवसांत प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करून त्याची प्रत्यक्ष चाचणी घेणार आहोत, असे ते म्हणाले.

शासनाच्या आदेशानुसार प्रकल्पाचे काम पूर्ण करू, असे आश्वासन प्रकल्प सहायक व्यवस्थापक नागेश यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Tags: