Belagavi

नियती फाऊंडेशन डेंग्यूबद्दल जनजागृती आणि प्रतिबंधात्मक लस वितरित

Share

नियती फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे निमित्त डेंग्यू जनजागृती व प्रतिबंधात्मक औषध वाटप करण्यात आले.
दीपप्रज्वलन करून पूजा केल्यानंतर डॉ सोनाली सरनोबत यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीबद्दल सांगितले. डॉ सुधीर बीके यांनी डेंग्यू आणि प्रतिबंध याविषयी सांगितले. डॉ सोनाली सरनोबत यांनी महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून नियती फाऊंडेशनकडून मंगल पाटील यांना एक शिलाई मशीन देऊन सहकार्य केले .
शाहुनगर येथील रहिवाशांसह महिला व बालकांना डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यात आली .

 

डॉ सुधीर बीके, युवापरिवर्तन समन्वयक प्रवीण सुलगेकर, माजी सेवा कर्मचारी सिद्धप्पा हिंगमिरे, मंगल पाटील, गीतांजली चौगुले, दीपाली मलकरी, कांचन चौगुले उपस्थित होते

Tags: