Chikkodi

उद्योग वाढले तर शहरे वाढतात : रोटरीचे विभागीय संचालक महेश कोटबागी

Share

“उद्योग वाढले तर शहरे वाढतील. शहरे वाढली तर बेरोजगारी दूर होईल. बेरोजगारी दूर झाली तर देश आर्थिकदृष्ट्या पुढे येईल,” असे मत रोटरीचे विभागीय संचालक महेश कोटबागी यांनी व्यक्त केले.

चिक्कोडी शहरातील केशव कला भवन येथे आयोजित चिक्कोडी रोटरी क्लबच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते म्हणाले, गेल्या ५० वर्षात चिक्कोडीचा खूप विकास झाला असून येत्या दहा वर्षात चिक्कोडी हे राज्यातील प्रतिष्ठित शहरांपैकी एक होईल. या दृष्टीने रोटरी क्लबने चिक्कोडीच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या निप्पाणीच्या आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, “समाजातील उणीव दूर करण्याचे काम रोटरी क्लब करत आहे. सजग नागरिकांची मोठ्या संख्येने सभासद असलेल्या रोटरी क्लबच्या सेवेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

चिक्कोडी सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी म्हणाले की, चिक्कोडी येथील रोटरी क्लबला ५० वर्षे पूर्ण होत असताना रोटरी क्लबचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो. रोटरी क्लबने केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

अविनाश पोतदार , शारदा पै, बबन देशपांडे, चिक्कोडी रोटरी क्लबचे अध्यक्ष शिवमूर्ती पडाळे, सचिव शिरीष मेहता , उपप्रांतिय पाल मकरंद कुलकर्णी, संस्थापक सदस्य विजय मांजरेकर, उदय पाटील, शिवकुमार हंजी आदी रोटेरियन्सच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उपस्थित होते..

Tags: