Accident

दुचाकी आणि टाटा एस यांच्यात झालेल्या अपघातात महिला ठार

Share

दुचाकी आणि टाटा एस यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना चिक्कोडी
तालुक्यातील निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावरील चिंचणी टोलनाक्याजवळ घडली.


या अपघातात , दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. महादेवी शिरगुप्पी (५४) असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
जखमी महांतेश शिरगुप्पी यांना चिक्कोडी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चिक्कोडी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.
ही घटना चिक्कोडी वाहतूक पोलीस ठाण्यांतर्गत घडली.

Tags: