Belagavi

माळमारुती पोलीस स्थानकाच्या आवारात वृक्षारोपण

Share

बेळगावच्या माळमारुती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे एम कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
सीपीआय कालीमिर्ची यांनी माळमारुती पोलीस स्थानकात अनुसूचित जाती , अनुसूचित जमातीची तक्रार निवारण बैठक घेतली . त्यानंतर पोलिसांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन अर्थपूर्णपणे साजरा केला.


पर्यावरण दिन हा एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो अखंड असावा. कामाच्या दबावातही विभागातील कर्मचाऱ्यांनी झाडे लावणे, त्यांचे संगोपन करण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे असे .सीपीआय कालीमिर्ची म्हणाले.

यावेळी सीपीआय जे एम कालीमिर्ची, एपीएमसी पोलीस स्टेशनचे विश्वनाथ कब्बूर, मार्केट इन्स्पेक्टर दयामनूर, एसीपी सोमगौडा उपस्थित होते.

Tags: