Belagavi

आंबेडकर निवासी शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवा; मंत्री एच.सी. महादेवप्पा याना आवाहन

Share

 

बेळगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भारतरत्न डॉ.बी.आर.आंबेडकर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवून दोन अतिरिक्त विद्यार्थी निवास बांधण्यात यावे, अशी मागणी करून मादिग आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने समाज कल्याण मंत्री एच.सी. महादेवप्पा यांना निवेदन देण्यात आले.

रविवारी बेळगावात आलेले समाजकल्याण मंत्री एच. महादेवप्पा यांची सर्किट हाऊस येथे मादिग आरक्षण संघर्ष समितीच्या सदस्यांनी भेट घेतली व बेळगावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भारतरत्न डॉ.बी.आर.आंबेडकर निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यास सांगितले. आता तेथे 125 विद्यार्थी शिकत असून त्यांना आणखी 25 विद्यार्थ्यांची संख्या वाढवायची आहे. शहरात मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी दोन अतिरिक्त वसतिगृहे बांधण्याची मागणी करणारे निवेदन देखील त्यांनी सादर केली. त्याला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी यल्लाप्पा हुदली, बसवराज अरवल्ली , शंकर दोडमणी यांच्यासह मादिग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: