Belagavi

बेळगावमधील चिदंबरनगर मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Share

शांबवी महिला मंडळातर्फे आणि लेकव्ह्यू हॉस्पिटलच्या सहकार्याने चिदंबरनगर येथील चिदंबरेश्वर मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 150 हून अधिक लोकांनी शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी रक्तदाब , शुगर, जनरल चेकअपसह नेत्र तपासणी देखील करण्यात आली, नेत्रतपासणी सिद्धार्थ नेत्रतज्ञ यांनी केली,
शांभवी महिला मंडळाने या तपासणी शिबिराला संधी देणारे लेकव्ह्यू हॉस्पिटलचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश सोनवलकर यांचा गौरव केला.
आरोग्याबाबत अधिकाधिक सेवांसाठी आपले रुग्णालय सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार अभय पाटील यांच्या सहकार्याने सर्वांना डेंग्यू ची लस देण्यात आली .

Tags: