Belagavi

बेळगाव येथील महात्मा फुले भाजी मार्केटमधील 6 दुकाने, 2 गोदामे महापालिकेकडून जप्त

Share

बेळगाव महानगरपालिकेकडून , महात्मा फुले भाजी मार्केटमधील बेकायदेशीरपणे वापरण्यात येत असलेली 6 दुकाने आणि 2 गोदामे जप्त करण्यात आली .

2022 मध्ये बेळगाव महापालिकेने येथील दुकानांचा लिलावही केला. मात्र आधीच्या भाडेकरूंनी त्यांना देण्यास नकार दिला. त्यामुळे दुकानांचे नवीन भाडेकरू अडचणीत आले होते. लिलावाचे पैसे देऊनही दुकान न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत आले होते. ही इमारत महापालिकेची असूनही काही लोकांनी ती आपलीच असल्याचे फलक लावले होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत गंभीर चर्चा झाली. त्यामुळे काल बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल विभागाने छापा टाकून सहा दुकाने व दोन गोदामे ताब्यात घेतली.

महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त रेश्मा तालिकोटी, मनपा कायदेशीर सल्लागार ऍड . उमेश महानशेट्टी, महसूल अधिकारी संतोष अन्नशेट्टी, महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Tags: